आज ३१ डिसेंबर २०११
म्हणता म्हणता हेही वर्ष सरून गेले
बघता बघता दिवसही ते संपून गेले
डायरीची पाने हि मग उलटून जराशी ,
क्षण हे आठवणींच्या हिंदोळ्यात विरून गेले ||
क्षणच ते............
काही हसवत गेले , काही हसत गेले
काही कुणाच्या सोबतीने , काही कुणा विना गेले
क्षणोक्षणींच्या आठवणी त्या .......
भूतकाळ तो मागे सरला ....
भविष्याचा वेध घेण्यास ,
वर्तमान तो सामोरी आहे
संकल्पाच्या गाठी सोडत
नववर्षाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत !
हि अखेरची घटका आणिक ,
एक नवी दिशा ती
त्या क्षितीजावर बघ....
नवीन उमेदीने नव्या आव्हाना सह उजाडते आहे !
उद्या पुन्हा होईल मग एक नवा सूर्योदय !!!!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
*** WISH U ALL A HAPPY NEW YEAR***
जयेश फडणीस